घरक्रीडाबीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय A संघाच्या कर्णधारपदी निवड

बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय A संघाच्या कर्णधारपदी निवड

Subscribe

आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, या संघात भारतीय संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसन याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, या संघात भारतीय संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसन याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मात्र, बीसीसीआयने आता संजू सॅमसन आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. संजू सॅमसनकडे भारतीय संघाच्या A संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. (India A vs New Zealand a bcci big decision sanju samson lead team odi series)

भारतीय A संघ न्यूझीलंड A विरुद्ध वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत संजू सॅसमन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड A चा संघ सध्या भारतात आला आहे. अलीकडेच भारत A सोबतची तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील तीनही सामने अनिर्णित राहिले. आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत भिडणार असून त्यासाठी सॅमसनकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अशाप्रकारे, निवडकर्त्यांनी सॅमसनवर मोठी जबाबदारी देत ​​आगामी काळात तो या योजनेचा एक भाग असल्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची सोमवारी 12 सप्टेंबरला घोषणा करण्यात आली. या संघात अनेक खेळाडूंना संधी मिळाली नाही. रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळला जाणाऱ्या 8व्या टी-20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यांना 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने खेळले जाणार असून, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

भारतीय A संघ : संजू सैमसन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकीपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, नवदीप सैनी आणि राजअंगद बावा.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई इंडियन्सने IPL2023 साठी केली नव्या मुख्य प्रशिक्षकांची निवड, ‘हे’ असतील नवे प्रशिक्षक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -