IND vs SA: भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह, वनडे मालिकेत खेळण्यावर शंका

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला आज(मंगळवार) पासून सुरूवात झाली आहे. यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. परंतु १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का माहिती समोर आली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली असून त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो वनडे मालिकेत कमी खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वॉशिंग्टन सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर

वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघातील खेळाडू बुधवारी मुंबईहून केप टाऊनसाठी रवाना होणार आहेत. मागील दहा महिन्यांपासून वॉशिंग्टन सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. २०२१ त्याने अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेरच आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला वनडे मालिकेसाठी निवडण्यात आले.

उद्या भारतीय संघ होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना

२२ वर्षाचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला वनडे मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. परंतु त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तो मालिका खेळणार की नाही?, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण भारताचा अष्टपैलू मैदानावर नसल्यामुळे भारतीय संघाला नुकसान देखील होऊ शकतं. परंतु वॉशिंग्टन सध्या मुंबईमध्ये आहे. वनडे मालिकेसाठी इतर खेळाडूंची निवड करण्याचं काम सुरू आहे. भारतीय संघ उद्या(बुधवार) दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.


हेही वाचा : Assembly Election 2022 : यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश