भारतात पहिल्यांदाच रंगणार डे-नाईट कसोटी सामना!

भारत आणि बांग्लादेशचा संघ प्रथमच दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळणार आहेत. विशेष म्हणजे भारतात खेळवला जाणारा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना ठरणार आहे.

india and bangladesh to play maiden day night test match at eden-gardens

भारत दौऱ्यासाठी आज बांग्लादेशचा संघ भारतात दाखल होणार आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये कोलकाता येथे दुसरा कसोटी सामना दिवसरात्र खेळवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने दिली आहे. २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत-बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या माध्यमातून भारत आणि बांग्लादेशचा संघ प्रथमच दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळणार आहेत. विशेष म्हणजे भारतात खेळवला जाणारा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना ठरणार आहे. दरम्यान बांग्लादेशच्या भारत दौऱ्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकांचा समावेस असणार आहे.

दिवस-रात्र कसोटीसाठी विराट कोहलीचा होकार

दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास यापूर्वी भारतीय संघ तयार नव्हता. त्यातच आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपद स्विकारल्यानंतर दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी गांगुलीने विराट कोहलीचा होकार मिळवला. त्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डापुढे बीसीसीआय कडून या सामन्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयचा प्रस्ताव मान्य केला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांचीमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांच्या कमी संख्येवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

गांगुलीने मानले कोहलीचे आभार

दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीने होकार दिल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या कर्णधाराचे आभार मानले. सौरव गांगुली म्हणाले की, “ही चांगली सुरुवात असून कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतली. दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी तयार झाल्याने आम्ही विराट कोहलीचे आभार मानतो.