घरक्रीडादुसऱ्या कसोटीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया दिल्लीत भिडणार, कांगारू ६३ वर्षांचा इतिहास मोडणार का?

दुसऱ्या कसोटीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया दिल्लीत भिडणार, कांगारू ६३ वर्षांचा इतिहास मोडणार का?

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ चा पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १३२ धावांनी पराभव केला. आता दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ दिल्लीत भिडणार आहे. मात्र, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत अनेक कसोटी सामने खेळवण्यात आले. परंतु त्यामध्ये भारतीय संघाचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे.

गेल्या ६ दशकांत ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाचा पराभव करण्यात यश मिळालं नाही. जवळपास ६३ वर्षांत ऑस्ट्रेलिया संघाला दिल्लीत एकाही कसोटी सामन्यात भारताला हरवता आलेलं नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कांगारू भारतीय संघाचा ६३ वर्षांचा इतिहास मोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

१२ डिसेंबर १९५९ साली भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा एक डाव आणि १२७ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर २८ नोव्हेंबर १९६९मध्ये दिल्लीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सनी पराभव केला. १० ऑक्टोबर १९९६, २९ ऑक्टोबर २००८ आणि २२ मार्च २०१३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला होता.


हेही वाचा : क्रिकेटर पृथ्वी शॉने सेल्फी दिला नाही म्हणून फॅनला राग अनावर, बॅट घेऊन गाडीचा पाठलाग केला अन्

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -