घरक्रीडाभारताचे फलंदाज वर्ल्ड क्लास

भारताचे फलंदाज वर्ल्ड क्लास

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड या विश्वचषकातील दोन अपराजित संघांमध्ये गुरुवारी सामना होणार आहे. भारताने आतापर्यंत २, तर न्यूझीलंडने ३ सामने जिंकले आहेत. या स्पर्धेतील १६ सामन्यांत एकूण ६ शतके झाली असून यापैकी २ शतके ही भारतीय फलंदाजांच्या (रोहित शर्मा, शिखर धवन) नावे आहेत.

सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत लोकी फर्ग्युसन (८) आणि मॅट हेन्री (७) हे न्यूझीलंडचे गोलंदाज अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताची फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची गोलंदाजी असे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारताच्या वर्ल्ड क्लास फलंदाजांना बाद करणे आव्हानात्मक असेल, असे मत लोकी फर्ग्युसनने व्यक्त केले.

- Advertisement -

भारताचे आघाडीचे फलंदाज खूपच संयमाने खेळतात. त्यामुळे त्यांना बाद करणे हे आव्हान असते. जेव्हा तुम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा या फलंदाजांविरुद्ध तुम्हाला अधिक धावा मोजाव्या लागतात. भारताच्या संघात बरेच वर्ल्ड क्लास फलंदाज असल्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये आम्हाला विकेट मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा ते खूप मोठी धावसंख्या उभारू शकतील. भारताने मागील दोन्ही सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली. हा संघ या विश्वचषकातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे, असे फर्ग्युसन म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -