अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तावर ४ गडी राखत दणदणीत विजय

भारताने दुबईमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानचा ४ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात यूएईचा १५४ धावांनी पराभव केला होता. तरह दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून दोन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता.

तीन सामन्यानंतर अ गटात भारताचे आता ६ गुण झाले आहेत. तर उपांत्य फेरीसाठी ते आरामात पात्र ठरले आहेत. भारतीय संघाला अफगाणिस्तानने २६० धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु भारताने ४८.२ षटकांत ६ गडी राखत हे २६० धावांचं आव्हान पूर्ण केलं आहे.

भारताकडून हरनूर सिंगने ७४ बॉलमध्ये नऊ चौकार लगावत ६५ धावा केल्या. तर राज बावाने ५५ बॉलमध्ये दोन चौकार लगावत ४३ धावा पूर्ण केल्या आहेत. तर कर्णधार यश धुलने २६ धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमधून नूर अहमदने भारताच्या चार विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघाकडून राजवर्धन,राज बाजवा , विक्की आणि कौशलने १-१ असे विकेट घेतले आहेत. तसेच पाकिस्तान संघाने सुद्धा अंतिम ४ चे स्थान गाठले आहे.


हेही वाचा : सूर्यकुमार यादवने जिंकली चाहत्यांची मनं, उत्कृष्ट खेळीमुळे मिळाला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार