घरक्रीडाभारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय; डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी वाया

भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय; डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी वाया

Subscribe

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे.

नवी दिल्ली : आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची समजली जाणारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवशी मालिकेतील आज पहिला सामना मोहालीत खेळल्या गेला. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलिया संघावर पाच गडी राखत दणदणित विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी वाया गेली. सोबतच भारतीय संघातील सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतला तर शमी-गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी चमकदार कामगिरी केली. (India beat Australia by five wickets David Warner’s half-century was wasted)

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्वबाग 276 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 52, जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या.

- Advertisement -

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघातील ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. ऋतुराज गायकवाडने 71 धावांची तर शुभमन गिलने 74 धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार के.एल. राहुलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 49 व्या षटकात शॉन अॅबॉटला षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

हेही वाचा : पुढील महिन्यांत मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या राहणार बंद; एअरपोर्ट प्राधिकरणाने सांगितले कारण

27 वर्षांनतर ऑस्ट्रेलियावर विजय

आज मोहालीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. भारताने 1996 नंतर म्हणजेच 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. 1996 नंतर ऑस्ट्रेलियाने 2006, 2009, 2013 आणि 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला. म्हणजे या मैदानावर ऑस्ट्रेलियाने शेवटचे चार वनडे जिंकले होते.

हेही वाचा : World Cup 2023 : विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘अशी’ मिळणार बक्षिसं; आयसीसीकडून यादी जाहीर

एकदिवशी सामन्यांच्या क्रमवारीत भारत अव्वल

या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाईल. तर तिसरा वनडे 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांची ही शेवटची मालिका आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ आपली तयारी पूर्ण करू इच्छितात. या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकत वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन टीम बनली आहे.\

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -