भारताचा 6 गडी राखत ऑस्ट्रेलियावर विजय; 2-1 ने जिंकली टी-20 मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघानं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 19.5 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. सूर्यकुमार यादवने 69 धावा केल्या, तर कोहलीने 63 धावांची खेळी केली.

सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने कोहलीला चांगली साथ दिली. दोघांनीही उत्तम कामगिरी केल्यामुळे भारताला लक्ष्य गाठण्यात यश मिळाले. शेवटच्या 20 व्या ओव्हर्समध्ये अतितटीचा सामना सुरू होता. तेव्हा दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या मैदानात होता. परंतु हार्दिक पंड्याने शेवटच्या क्षणी चौकार मारून उत्कृष्ट कामगिरी करत हे आव्हान पूर्ण केलं.

या विजयासह भारताने तीन सामन्यांची T20 मालिका 2-1 ने जिंकली. पहिला टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 भारताने जिंकला. तिसऱ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कॅमरन ग्रीनने 21 चेंडूत 52 तर टीम डेव्हिडने 27 चेंडूत 54 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 19.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाला मायदेशात तब्बल नऊ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभूत करण्यात यश आले आहे.


हेही वाचा : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज ‘करो या मरो’ची स्थिती, कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी