Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा भारताचा इंग्लंडवर मोठा विजय, विश्वचषकावर कोरलं नाव

भारताचा इंग्लंडवर मोठा विजय, विश्वचषकावर कोरलं नाव

Subscribe

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात महिला संघाने भारताचे नाव कोरले आहे. आजच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर मात करत मोठा विजय मिळवला आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्तम कामगिरी केली. भारताने 7 विकेट्स राखून या सामन्याचा इतिहास घडवला आहे.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरलेला इंग्लंड संघ अवघ्या 68 धावांत गुंडाळला गेला. भारताने हे आव्हान सहजरित्या पूर्ण करत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. शेफालीनेही 7 सामन्यांत 172 धावा केल्या. तर गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक 11 विकेट्स घेतल्या आहेत. तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोमन सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

- Advertisement -

भारताने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हिपला शून्यावर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर भारताने भेदक गोलंदाजीचा मारा करत इंग्लंडला अजून धक्के दिले आणि संघाला 68 धावातच गुंडाळलं.

2006मध्ये 19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने 71 धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे.


हेही वाचा : ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी १३ खेळाडू बंगळुरूमध्ये दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -