घरICC WC 2023वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा प्रवेश; 70 धावांनी न्यूझीलंडला केलं पराभूत

वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा प्रवेश; 70 धावांनी न्यूझीलंडला केलं पराभूत

Subscribe

वनडे वर्ल्डकपच्या पहिला उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. या समान्यात भारताने इतक्या धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात रनमशीन विराट कोहली आणि आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 397 धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले.

वनडे वर्ल्डकपच्या पहिला उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. या समान्यात भारताने इतक्या धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात रनमशीन विराट कोहली आणि आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 397 धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांने तब्बल सात विकेट घेत भारताला दमदार विजय मिळवून दिला. (India beat new zealand by 70 runs enter final match of odi world cup 2023)

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वनडे वर्ल्डकपच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर यजमान भारताने कडवे आव्हान ठेवले आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 379 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने चार गडी गमावून 397 धावा केल्या.

- Advertisement -

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या फलंदाजीच्या सामन्यात धुमाकूळ घातला आणि एकूण 397 धावा ठोकल्या. त्यानंतर 398 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद शमीने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.

कोहली आणि अय्यर शतकवीर

भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार शतकी खेळी खेळली. कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले. कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. अय्यरने या खेळीत 4 चौकार आणि 8 शानदार षटकार मारले.

- Advertisement -

विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं 50 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडीत काढला. वानखेडेवरील उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा दिला. विराट कोहलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. 2009 मध्ये विराट कोहलीने वनडेतील पहिले शतक ठोकले होते.

मोहम्मद शमीच्या सात विकेट

मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्यांदा पाच विकेट्स पटकावत विजयाचं पारडं भारतीय संघाच्या दिशेने झुकवलं. या सामन्यात मोहम्मद शमीने एकूण सात विकेट घेतल्या.


हेही वाचा – IND VS NZ : विराटच्या शतकी खेळीनंतर पत्नी अनुष्काच्या डोळ्यात आनंदाश्रृ; फ्लाइंग किस देताना झाली भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -