Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND VS NZ ODI : भारताचा 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

IND VS NZ ODI : भारताचा 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड (IND VS NZ ODI) यांच्यातील वनडे मालिकेचा दुसरा सामना आज रायपूर येथे पार पडला. या सामन्यात भारताने 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने भारताला 108 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु भारताने 2 गडी गमावत 109 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं.

भारताने प्रथम टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी भारताने न्यूझीलंडला 108 धावांमध्येच गुंडाळले. त्यानंतर भारताने 21 षटकांमध्‍ये 2 गडी गमावत 109 धावांचे लक्ष्य पूर्ण करत मालिका आपल्या खिशात घातली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्‍या पाच षटकांमध्‍ये संयमित खेळीचे प्रदर्शन घडवले.

- Advertisement -

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर मायकेल ब्रेसवालने 22 आणि मिचेल सँटनरने 27 धावा केल्या. संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर संघर्ष केला.

- Advertisement -

31 व्‍या षटकात न्‍यूझीलंडने 7 गडी गमावत 103 धावा केल्‍या. 32 व्या षटकांत वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला आठवा धक्का दिला. 34 व्‍या षटकात वॉशिंग्टन सुंदरने लॉकी फर्ग्युसनची विकेट घेतली. तर कुलदीप यादवने ब्लेअर टिकनरला बाद केले. 34.3 षटकांमध्‍येच अवघ्‍या 108 धावांमध्‍ये न्‍यूझीलंडचा डाव आटोपला.

असे होते दोन्ही उभय संघ –

भारताचा संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडचा संघ

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू/सी), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर


हेही वाचा : Ranji Trophy : दिल्लीचा मुंबईवर दमदार विजय; ४२ वर्षांनंतर केली मात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -