घरक्रीडाभारताचा दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय, टी-20 मालिका जिंकून रचला इतिहास

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय, टी-20 मालिका जिंकून रचला इतिहास

Subscribe

नवी दिल्ली : गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी- 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत भारताने इतिहास रचला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने प्रथमच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. याशिवाय या सामन्यात दोन्ही संघांकडून मोठी धावसंख्या उभारण्यात आली. दोन्ही संघांनी मिळून 459 धावांचा पाऊस पाडला.

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका 221 धावाच करता आल्या. डेव्हिड मिलर आणि डी कॉक यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि केवळ 1 धावसंख्या असताना त्यांचे 2 गडी बाद झाले. टेम्बा बावुमा आणि रिले रॉसो यांना भोपळाही फोडता आला नाही. अर्शदीप सिंगने हे दोन धक्के दिले. त्यानंतर एडन मार्करम आणि डी कॉक यांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने मार्करमला त्रिफळाचीत केले. त्यानंतर डेव्हिड मिलरने नाबाद 106 आणि डी कॉकने नाबाद 69 धावा केल्या. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

- Advertisement -

भारताकडून के एल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली. राहुलने 28 चेंडूत 57 धावा, तर सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावा केल्या. सूर्याने तुफान फटकेबाजी करत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 28 चेंडूत 49 धावांची खेळी केली आणि तो नाबाद राहिला. तर, दिनेश कार्तिकने 7 चेंडूत 17 धावा केल्या.

- Advertisement -

भारताच्या डावाची सुरुवात के एल राहुल आणि रोहित शर्मा यांनी केली. या जोडीने 96 धावांची भागीदारी केली. दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये 57 धावा केल्या. मात्र 43 धावांवर रोहित शर्मा केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर के एल राहुल बाद झाला, त्याने 57 धावांची जोरदार खेळी केली. त्यालाही केशव महाराजने पायचीत केले. सूर्यकुमार यादव 61 धावांवर रनआऊट झाला. भारताकडून हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले.

भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढली. दक्षिण आफ्रिकेच्या चार गोलंदाजांच्या प्रत्येक षटकांत सरासरी 12हून अधिक धावा कुटल्या. रबाडा 4 षटकांत 57, वेन पारनेल 54, लुंगी एनगिडी 49 धावा तर, ओन्रिक नोरखियाने 3 षटकात 41 धावा दिल्या. केशव महाराज हे एकमेव गोलंदाज होते ज्यांनी उत्तम गोलंदाजी करताना 23 धावांत 2 बळी घेतले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -