दक्षिण आफ्रिकेकडून भारताच्या बलाढ्य संघाचा पराभव, पहिला वनडे 31 धावांनी जिंकला

शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावल्याने संघाचा काहीशा आशा पल्लवित झाल्या होत्या, पण हे दोघे बाद होताच भारताचे आव्हान संपुष्टात आले. शिखर धवनने 79 आणि विराट कोहलीने 51 धावा केल्यात. शेवटी शार्दुल ठाकूरनेही नाबाद अर्धशतक झळकावले, मात्र त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही.

नवी दिल्लीः कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ फॉर्मेट बदलून खेळात बदल करेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे काहीच घडलेले नाही. भारताच्या बलाढ्य संघाला बोलंड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेकडून (India Vs South Africa) पराभव पत्करावा लागलाय. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 296 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, प्रत्युत्तरात भारतीय संघ लक्ष्यापासून खूप दूर गेला.

शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावल्याने संघाचा काहीशा आशा पल्लवित झाल्या होत्या, पण हे दोघे बाद होताच भारताचे आव्हान संपुष्टात आले. शिखर धवनने 79 आणि विराट कोहलीने 51 धावा केल्यात. शेवटी शार्दुल ठाकूरनेही नाबाद अर्धशतक झळकावले, मात्र त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. या पराभवामुळे भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली असून, आता त्यांना विजयासाठी शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला रासी वान डेर डुसेन, ज्याने 96 चेंडूत नाबाद 129 धावा फटकावल्यात. टेंबा बावुमानेही 110 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी आणि फेहलुकवायो यांनी 2-2 बळी घेतले. एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी 1-1 गडी बाद केला. पदार्पण करणाऱ्या मार्को यान्सनला यश मिळालेले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले.

भारताची मिडल ऑर्डर फ्लॉप

297 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. विशेषतः शिखर धवनने येताच फटकेबाजी केली पण कर्णधार असलेला केएल राहुल लयीत दिसला नाही. राहुलने त्याची विकेट मार्करामला दिली, त्याला केवळ 12 धावा करता आल्या. मात्र, यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी अप्रतिम भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 102 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने अवघ्या 18.2 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या आणि शिखर धवनने अवघ्या 51 चेंडूत आपले 35 वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 26 व्या षटकात केशव महाराजने शिखर धवनला 79 धावांवर बाद करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहलीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले, पण एका खराब शॉटने त्याचा डाव संपवला.


हेही वाचाः ICC Test Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये विराट कोहली ७ व्या स्थानी, पंत- बुमराहचा फायदा