घरक्रीडाIND vs ESP : हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, स्पेनचा पराभव

IND vs ESP : हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, स्पेनचा पराभव

Subscribe

हॉकी विश्वचषकात भारताने स्पेनवर मात करत विजयाची सलामी दिली आहे. भारताने स्पेन संघाविरुद्ध 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. भारत आणि स्पेन यांच्यात ओडिशातील राउरकेला स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. यावेळी भारताने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघांचं कौतुक केलं जात आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतासाठी अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी गोल केला. 1-0 अशी आघाडी घेतल्यावर भारताने आणखी दमदार खेळ सुरु केला. 12व्या मिनिटाला रोहिदास अमितने गोल करताना भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. रोहिदास अमितने केलेला गोल भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेतील 200 वा गोल ठरला. तर 26 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने दमदार खेळी करत एक अप्रतिम गोल केला. त्यानंतर हाल्फ टाईम झाला. हाल्फ टाईमवेळी भारतीय संघ 2-0 असा आघाडीवर होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hockey India (@hockeyindia)

- Advertisement -

भारताशिवाय डी गटातील इंग्लंड आणि वेल्स यांचाही आज सामना झाला. ज्यामध्ये इंग्लंडने 5-0 असा दमदार विजय मिळवला. दरम्यान, भारतीय संघाचा पुढील सामना 15 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध असणार आहे. 8 ऑलिम्पिक सुवर्णपदकं नावावर असलेल्या भारतीय हॉकी संघाने केवळ एकदाच वर्ल्ड कप जिंकला आहे. 1975 मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. 1971 मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्य आणि 1973 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

- Advertisement -

हॉकी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या संघात सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने 313 गोल केले आहेत. त्यानंतर 267 – नेदरलँड्स, 235 – पाकिस्तान, 200 – भारत, 180 – इंग्लंड, 176 – स्पेन आणि 154 – अर्जेंटिना असे गोल अनुक्रमे संघाकडून करण्यात आले आहेत.


हेही वाचा : Hockey World Cup 2023: भारत वि. स्पेन यांच्यात रंगणार पहिला सामना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -