घरक्रीडाभारतीय रणरागिणींचा पाकिस्तानवर विजय

भारतीय रणरागिणींचा पाकिस्तानवर विजय

Subscribe

मितालीच्या दमदार खेळीमुळे ७ गडी राखून भारताची पाकिस्तानवर मात

कॅरेबियन बेटांवर सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषकात रविवारी भारताने ७ गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. ‘ब’ गटामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवून ४ गुणांसह ‘ब’ गटात क्रमवारीत वरच्या स्थानावर झेप घेतली. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी न्यूझीलंडवर मात केली होती. भारताचा पुढील सामना १५ नोव्हेंबर रोजी आयर्लंड विरूध्द होणार आहे. पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. यानंतर पाकिस्तानला मात्र आत्ता पुढचा रस्ता कठीण झाला आहे.

पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी १३५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. १३५ ही पाकिस्तानंन भारताविरोधात उभारलेली टी-२० मधील सर्वाधिक धावसंख्या होती. पाकचं आव्हान पार करण्यासाठी भारताने मिताली राजला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवले. याचा भारताला खूपच चांगला फायदा झाला. मितालीने ४७ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावांची निर्णायक खेळी केली.

- Advertisement -

सर्वप्रथम भारताची फलंदाजी सुरू व्हायच्या अगोदरच त्यांच्या धावफलकावर १० रन्स होते, कारण पाकिस्तानी फलंदाजांना दोन वेळा ५ रन्सची पेनल्टी लागली होती. भारताने अवघ्या १९ ओव्हर्समध्ये १३५ धावाचं हे लक्ष्य गाठले. न्यूझीलंड विरूध्द शतक मारलेली हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमुर्ती हे शेवटपर्यंत नाबाद राहिले. दोघींनी अनुक्रमे १४ आणि ८ धावा केल्या.

भारताला मिताली आणि स्मृतीच्या रूपात खूप चांगली सुरूवात मिळाली. दोघांनी सुरूवातीला ७३ धावांची भागीदारी केली. यानंतर १५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर निदा दारने स्वतःच्या चेंडूवर जेमिमा रोड्रिग्ज (१६) हिचा झेल घेतला. दुसऱ्या विकेटसाठी तिने मिताली राजसोबत २८ धावांची भागिदारी केली. त्यानंतर १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डायना बेगने मिताली राजला निदा दारकरवी झेलबाद केले. पाकिस्तानकडून डायना बेग, निदा दार आणि बिसमाह मारुफने संयुक्तपणे १-१ बळी घेतले.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय उत्तम ठरला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या ३ फलंदाजांना अवघ्या ३० धावांमध्ये माघारी धाडलं. भारतीय गोलंदाज अरुंधती रेड्डीने आयेशा झफरला भोपळाही फोडू दिला नव्हता. तर जवेरिया खान आणि उमानिया सोहील या फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद होऊन माघारी परतल्या होत्या. भारताकडून हेमलताने आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. अरुंधती रेड्डीने १ बळी घेतला.

पाकिस्तानने बिस्मा मारूफ (५३) आणि निदा दार (५२) च्या रूपात थोडी साथ मिळाली. यांनी चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. निदाने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५२ धावा केल्या होत्या. यावेळी झेलच्या रूपात पाकिस्तानी खेळाडूंना ३ जीवदानं देखील भारताकडून मिळाली. पाकिस्तानच्या तळातल्या फलंदाजांनीही फटकेबाजी करत स्कोरबोर्डवर थोडीफार धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, भारतासमोर त्यांची डाळ काही शिजली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -