IND vs SL 3rd ODI: भारताचा 317 धावांनी विजय, श्रीलंकेला व्हाईटवॉश

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा वनडे सामना पार पडला. यावेळी भारताने तिसऱ्या सामन्यात विश्वविक्रमी विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेला 317 धावांनी पराभूत करत श्रीलंकेला व्हाईटवॉश केलं आहे. भारतीय संघाने भेदक गोलंदाजीचा मारा करत श्रीलंकेला 22 षटकांमध्ये 73 धावांवरच ऑलआऊट केलं आहे.

भारताने श्रीलंकेला 391 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात अत्यंत खराब पद्धतीने झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक मारा करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. मोहम्मद सिराजने 4 तर शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 गडी बाद केले. अविष्का फर्नांडो 1, कुशल मेंडिस 4, वनिंदू हसरंगा 1 आणि नुवानिदू फर्नांडो यांना बाद केल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी संपूर्ण डाव सावरला. श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर कर्णधार दासून शनाकाने 11 धावा केल्या.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गील यांनी उत्कृष्ट खेळी केली. विराट कोहलीने नाबाद 166 तर शुभमन गीलने 116 धावा केल्या. या व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा 46, श्रेयस अय्यर 38, केएल राहुल 7, सूर्यकुमार यादव 4 आणि अक्षर पटेल 2 धावा करून नाबाद राहिला.

दुसऱ्या वनडे सामन्यातही भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 39.4 षटकात 215 धावा केल्या. तर 216 धावांचं आव्हान हे श्रीलंकेने भारताला दिलं होतं. यावेळी भारताने धमाकेदार खेळी करत दुसरीही मालिका खिशात घातली.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंकेनंतर भारतात न्यूझीलंडचा संघ दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. अशातच या दोन्ही संघाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं याबाबतची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा तर टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे.


हेही वाचा : IND vs SL : विराटची शतकी खेळी, भारताचं श्रीलंकेसमोर 391 धावांचं आव्हान