ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आहे. आयसीसीने आज क्रमवारी जाहीर केली. या जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघ कसोटी क्रमवारीत नंबर वनची टीम बनली आहे. भारतीय संघाने सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला डंका वाजवला आहे. टी-20, एकदिवसीय सामना आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे की, जेव्हा एखादा संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्याच क्रमांकाच्या आघाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाने इतिहास रचला आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ –
टी-20 रँकिंग – भारत नंबर 1, 267 रेटिंग्स
वनडे रँकिंग – भारत नंबर 1, 114 रेटिंग्स
टेस्ट रँकिंग – भारत नंबर 1, 115 रेटिंग्स
आयसीसीकडून दर बुधवारी नवीनतम क्रमवारी जाहीर केली जाते. यावेळी नागपूर कसोटी संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. आता भारताचे कसोटीत 115 रेटिंग्स गुण आहेत. तर ऑस्ट्रेलिया नंबर 2 वर पोहोचला आहे.
भारतीय संघ 1973 मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत नंबर-1 बनला होता, त्यानंतर टीम इंडियाला बरीच प्रतीक्षा करावी लागली. 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर-1 बनली होती, त्यानंतर 2011 पर्यंत त्याच स्थानावर होती. तसेच 2016 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अव्वल स्थान गाठले होते. 2020 मध्येही टीम इंडिया टॉप-3 मध्ये होती. आता पुन्हा एकदा 2023 मध्ये टीम इंडिया नंबर-1 वर पोहोचली आहे.
हेही वाचा : Viral Video : शाहरुखच्या पठाण गाण्यावर विराट, जाडेजाने धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल