Video : चक्क चेंडूने नारळ फोडला; आरपी सिंहने भेटायलाच बोलावले

एका तरुणाचा सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल झाला आणि चक्क त्याला माजी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांनी भेटायलाच बोलावले.

india bowler rp singh call gorakhpur yorker machine cricketer ritesh yadav after viral his video
Video : चक्क चेंडूने नारळ फोडला; आरपी सिंहने भेटायलाच बोलावले

उत्तर प्रदेशच्या गोरखपुर जिल्ह्यात दोन दिवसांपासून एका व्यक्तीची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण या व्यक्तीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, माजी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आरपी सिंहपर्यंत पोहोचला आणि मग काय हा व्हिडिओ पाहून त्यांनी त्या व्यक्तीला लॉकडाऊन संपल्यावर चक्क भेटायलाच बोलावले.

काय आहे हा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये दोन शूजच्यामध्ये एक नारळ ठेवण्यात आला आहे आणि हा नारळ एक व्यक्ती चेंडूच्या मदतीने नेम धरत मारताना दिसत आहे. विषेश म्हणजे ती व्यक्ती धावत येऊन नंतर गोलंदाज करताना दिसत आहे. मात्र, त्या व्यक्तीचा नेम अगदी बरोबर त्या नारळावर लागतो आणि तो नारळ फुटतो. असं या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आता याची दखल चक्क माजी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांनी घेतली आहे.

कोण आहे ही व्यक्ती

गोरखपुर जिल्ह्यातील सिंघडिया येथे राहणाऱ्या व्यक्तीचे नाव रितेश यादव असून त्याला लोक ‘यार्कर मशीन’ या नावाने संबोधतात. रितेशने २४ एप्रिल रोजी नारळ फोडीचा व्हिडिओ ट्विट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि रितेश चर्चेत आला. रितेशला आयपीएलमध्ये खेळण्याची फार इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता याची दखल घेत माजी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांनी रितेशला आपल्या अकादमीमध्ये भेटण्यास देखील बोलावले आहे.

आरपी सिंहने केले कौतुक

‘जबरदस्त यार्कर. ग्रामीण भागात देखील खरोखरच प्रेरणा घेण्यासारखे लोक आहेत. त्यातच आपल्या देशात देखील एकापेक्षा जास्त तरूण आहेत ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घेता येऊ शकते. रितेश तुझी इच्छा असल्यास लॉकडाउन संपल्यानंतर तू लखनऊ किंवा ग्रेटर नोएडा येथील कॅम्पमध्ये प्रशिक्षणासाठी येऊ शकतो. तसेच तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी तुला शुभेच्छा देतो’.

रितेशची प्रतिक्रिया

धन्यवाद सर, मला तुम्ही ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला त्या योग्यतेचे समजलात. मला तुमच्याकडून प्रशिक्षण घेण्यास फार आवडेल जेणेकरुन मी माझे कौशल्य पुढे वाढवू शकेन आणि तुमच्याप्रमाणे माझा जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्वल करू शकेन.


हेही वाचा – …तर पुढील वर्षीचे ऑलिम्पिक रद्द होईल!