भारताने पाकिस्तानला नमवले

सॅफ कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला.

सौजन्य - Sportskeeda

भारतीय फुटबॉल संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सॅफ कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात ३-१ असा पराभव केला. त्यामुळे भारताने सॅफ कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

मनवीरचे दोन गोल 

या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधीही मिळाल्या. पण दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत या सामन्याचा स्कोर ०-० असाच राहिला. मध्यंतरानंतर भारताने आक्रमक सुरुवात करत ४८ व्या मिनिटाला या सामन्यात आघाडी मिळवली. भारतासाठी मनवीरने हा गोल केला. तर ६९ व्या मिनिटाला पुन्हा मनवीरने गोल करत भारताची आघाडी २-० केली. ८४ व्या मिनिटाला सुमित पास्सीने गोल करत भारताची आघाडी ३-० केली. यानंतर पाकिस्तानने ८८ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी कमी केली. पण भारताने २ गोलचा फरक कायम राखत हा सामना जिंकला. त्यामुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.