घरक्रीडाग्रासकोर्ट भारतासाठी फलदायी; भारत-डेन्मार्क डेव्हिस चषक उद्यापासून सुरू

ग्रासकोर्ट भारतासाठी फलदायी; भारत-डेन्मार्क डेव्हिस चषक उद्यापासून सुरू

Subscribe

यजमान भारतीय संघ विजयी शुभारंभ करण्यास उत्सुक असून शुक्रवार, ४ मार्च रोजी रोहन बोपन्नाचा ४२ वा बर्थडे आहे. त्याला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी रामकुमार रामनाथन तसेच युकी भांबरी कसोशीने प्रयत्न करेल, यात शंका नाही. प्रतिस्पर्धी डॅनिश खेळाडूंचा खेळ बहरतो.

नवी दिल्ली : राजधानीतील दिल्ली जिमखान्याच्या ग्रास कोर्टवर शुक्रवार ४ मार्च व शनिवार, ५ मार्च रोजी भारत विरुद्ध डेनमार्क यांच्यातील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील लढत रंगेल. दिल्ली जिमखान्याच्या ग्रास कोर्टवर ५० वर्षानंतर महत्वाची तसेच मोठी स्पर्धा होत आहे. रोहित राजपालच्या भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे पाहुण्यांच्या तुलेनत भारताची स्थिती मजबूत वाटत आहे. शिवाय सामने ग्रास कोर्टवर होणार असल्याचा फायदा यजमान भारताला निश्चितच होईल, असे वाटते. डॅनिश कर्णधार फ्रेडरीन निल्सननेही याला सहमती दर्शवली आहे.

यजमान भारतीय संघ विजयी शुभारंभ करण्यास उत्सुक असून शुक्रवार, ४ मार्च रोजी रोहन बोपन्नाचा ४२ वा बर्थडे आहे. त्याला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी रामकुमार रामनाथन तसेच युकी भांबरी कसोशीने प्रयत्न करेल, यात शंका नाही. प्रतिस्पर्धी डॅनिश खेळाडूंचा खेळ बहरतो. क्ले आणि फास्ट कोर्टवर पण ग्रास कोर्टचे पाहुण्या खेळाडूंना वावडे असल्यामुळे रामकुमार आणि युकीकडून विजयाची अपेक्षा आहे. रामकुमार हा भारताचा अव्वल खेळाडू. त्यामुळे त्याला पसंती अपेक्षितच होती. कर्णधार रोहित राजपालने एकेरीच्या दुसऱ्या लढतीसाठी युकी भामरीला खेळवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

प्रज्ञणेश गुणशेखरच्या नावाची चर्चा होती. पण अखेरीस कर्णधार रोहित राजपालने युकीच्या बाजूने कौल दिला. दिल्ली सध्या दुपारी बऱ्यापैकी ऊन असते. खूप वर्षच्या प्रतीक्षेनंतर दिल्ली जिमखान्याला मोठ्या स्पर्धेतील सामने आयोजित करण्याची संधी लाभली असून गुरुवारी या परिसरात विजय अमृतराज, बुजुर्ग जयदीप मुखर्जीसारखे माजी नामवंत टेनिसपटू हजर होते. शुक्रवारी दिल्लीकर टेनिसप्रेमी या डेव्हिस चषक लढतीसाठी हजेरी लावून युवा भारतीय टेनिसपटूना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा आहे.

तीन वर्षानंतर घरच्या कोर्टवर (मायदेशी) डेव्हिस चषकाची लढत खेळायला मिळत असल्यामुळे रोहन बोपन्ना खूष असला तरी तो डॅनिश प्रतिस्पर्धी संघाला हलकं लेखत नाही. आम्ही पूर्ण तयारीनिशी कोर्टवर उतरणार आहोत, असे रोहन म्हणाला. त्याचा हा डेव्हिस चषक स्पर्धेतील ३१ वा सामना असून तो आपल्या संघ सहकारी, त्यांच्या सकारात्मक डावपेच आणि सांघिक वृत्तीबाबत समाधानी आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी रोहन बोपन्नाला दुखापतीने (खांदा) सतावले होते. पण त्याने योगा करायला सुरुवात केली. ती त्याच्या पथ्यवर पडली. त्याचा योगा गुरु मोहन देखील दिल्लीला आला असून त्याच्याकडून रोहनने बंगलोरला खुप मेहनत घेतली. योगावर त्याचा भर होता. रोहन बोपन्न दिवजी शरणच्या साथीने दुहेरीत खेळणार आहे. ही लढत शनिवारी होणार असून त्यावर या लढतीचा निकाल काय लागेल, याचा अंदाज बांधता येईल.

भारत विरुद्ध डेनमार्क डेव्हिस चषक लढत

शुक्रवार, ४ मार्च एकेरीच्या लढत –
१. रामकुमार रामनाथन वि. क्रिस्तीयन सिग्ज गार्ड
२. युकी भांबरी वि. मायकेल टॉरपोगार्ड

शनिवार, ५ मार्च दुहेरी –
१. दिवजी शरण – रोहन बोपन्न वि. योहानस इगलिडसन – फ्रेड्रिक निलसन

परतीची एकेरी लढत –
१. रामकुमार रामनाथन वि. मायकेल टॉरपोगार्ड
२. युकी भांबरी वि. क्रिस्तीयन सिग्जगार्ड


हेही वाचाः IND vs SL : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार टीम इंडिया, कधी आणि कुठे पाहाल सामना?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -