घरक्रीडाभारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; या कॅलेंडर वर्षात अनेक सामन्यांमध्ये विजय

भारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; या कॅलेंडर वर्षात अनेक सामन्यांमध्ये विजय

Subscribe

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. 3 वनडे मालिकेत भारताने 2-1ने बरोबर करून मालिका खिशात घातली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. 3 वनडे मालिकेत भारताने 2-1ने बरोबर करून मालिका खिशात घातली. सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने 99 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 3 विकेट्स राखून लक्ष्य गाठून सामना 7 विकेटने जिंकला. (India equals to Australia world record in terms of most wins in international cricket in a calendar year)

भारतीय संघाने एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 38 वा सामना जिंकला आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने आला. याआधी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर होता.

- Advertisement -

या संघाने 2003 मध्ये 38 सामने जिंकून हा पराक्रम केला होता. आता 2022 मध्ये भारताने 38 सामने जिंकून या संघाची बरोबरी केली. त्यानंतर आता भारताला ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी आहे. आणखी एक सामना जिंकून भारत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारा जगातील पहिला संघ बनेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ :

- Advertisement -
  • 38 सामने – 2003 मध्ये ऑस्ट्रेलिया
  • 38 सामने – 2022 मध्ये भारत
  • 37 सामने – 2017 मध्ये भारत

दिल्ली वनडेत भारताला विजयासाठी 100 धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि श्रेयस अय्यरने षटकार ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने 8 तर शुभमन गिलने 49 धावा केल्या. इशान किशन 10 धावा करून बाद झाला तर श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. संजू सॅमसननेही 2 धावांवर नाबाद राहून भारताला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – शिव्या दिल्याने T20 विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला बाहेरचा रस्ता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -