घरक्रीडाVirat Kohli In Form : आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली ७व्या स्थानावर

Virat Kohli In Form : आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली ७व्या स्थानावर

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) नुकताच वनडे फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला मोठा फायदा झाला आहे. या क्रमवारीच्या टॉप-१०यादीत विराट कोहलीचा समावेश झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) नुकताच वनडे फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला मोठा फायदा झाला आहे. या क्रमवारीच्या टॉप-१०यादीत विराट कोहलीचा समावेश झाला आहे. त्यानुसार, विराट कोहली सातव्या क्रमांकावर आला आहे. विराट रोहली मागील अनेक काळापासून टॉप-१० वनडे फलंदाजांच्या यादीत नव्हता. (India Former Captain Virat Kohli 7 Places In ICC Top 10 Batsman Rankings)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकताच झालेल्या सामन्यात विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विराटने ५४ धावांची खेळी केली होती. या अर्धशतकासह तो आयसीसी वनडे क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आला आहे. वनडे क्रमावारीत विराट कोहली सध्या ७१९ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ७०७ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

टी-२० विश्वचषकापासून विराटचा परतला फॉर्म

नुकताच झालेल्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने सर्वोकृष्ट फलंदाजी केली. या तुफानी खेळीनंतर विराटचा फॉर्म परत आला. कॅलेंडर वर्षात विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन वनडे शतक झळकावले आहे. या वर्षात विराट कोहलीने आतापर्यंत ९ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात ५३.३७ च्या स्ट्राईक रेटने आणि ११६.०६ च्या सरासरीने ४२७ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, विराट कोहली याने २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण १३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १५ डावांमध्ये त्याने ५१.७१ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.


हेही वाचा – IPL 2023: …तर सूर्यकुमार यादव असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -