घरक्रीडाT20 World Cup : माजी खेळाडू आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ; 'या'...

T20 World Cup : माजी खेळाडू आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ; ‘या’ प्रमुख खेळडूंना वगळले

Subscribe

आकाश चोप्राने आपल्या संघात अनेक युवा आणि काही अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यानुसार त्याने केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांची सलामीसाठी निवड केली आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने भारतीय संघाची निवड केली आहे. आकाश चोप्राने संघात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) , माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना संघात स्थान दिलेले नाही. आकाश चोप्राने आयपीएलच्या (IPL 2022) आधारावर संघाची निवड केली आहे. त्यामुळे त्याने यंदाचा आयपीएलचा विजेता संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले आहे.

आकाश चोप्राने आपल्या संघात अनेक युवा आणि काही अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यानुसार त्याने केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांची सलामीसाठी निवड केली आहे. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यालाही स्थान दिले आहे.

- Advertisement -

आकाश चोप्राचा भारतीय संघ :

संजू सॅसमन (Sanju Samson), दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik), अर्शदीप सिंह(Arshdeep Singh), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) , जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), मोहम्मद शमी, (Mohammed Shami), आवेश खान (Avesh Khan), दीपक हूडा (Deepak Hudda) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांनाही स्थान दिले आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका भारत दौरा करणार

भारतीय संघ (Indian Cricket Team) आता दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ 2 जून रोजी भारतात येणार आहे. राजधानी दिल्लीत हा संघ पोहोचणार असल्याचे समजते. यासोबतच भारतीय संघातीलही 5 खेळाडू गुरूवारी दिल्लीला (Delhi) दाखल होणार आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेला येत्या 9 जून रोजी सुरूवात होणार आहे. त्यानुसार, पहिली टी-२० (T-20) मालिका खेळवण्यात येणार आहे.


हेही वाचा – Ind Vs SA : दक्षिण आफ्रिकेचा संघ ‘या’ दिवशी दिल्लीला पोहोचणार; 9 जूनला खेळणार पहिला टी-२० सामना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -