घरक्रीडाभारतीय महिला संघ विजयी

भारतीय महिला संघ विजयी

Subscribe

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला चॅम्पिअनशिप क्रिकेट मालिकेत भारताने विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात स्म्रिती मानधनाने अप्रतिम फलंदाजी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या महिला चॅम्पिअनशिप क्रिकेट मालिकेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारताने ९ विकेट राखून जिंकला.

मानसी जोशीसमोर पडली श्रीलंकेची फलंदाजी फिकी

यजमान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्यासाठी चांगला राहिला नाही. कर्णधार चमारी जयागनी ( ३३ ) आणि श्रीपाली विराक्कोडी ( २६ ) वगळता श्रीलंकेच्या एकही फलंदाजाला चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या ९९ धावांतच आटोपला. भारताकडून मानसी जोशीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

मानधनाची आक्रमक फलंदाजी

९९धावांचा पाठलाग करताना भारतासाठी स्म्रिती मानधनाने अप्रतिम फलंदाजी केली. ९९ पैकी ७३ धावा तिने एकटीनेच केल्या. या ७३ धावा करण्यासाठी तिने फक्त ७६ चेंडू घेतले. ज्यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तिच्या या खेळीमुळे भारताने ९९ धावांचे लक्ष अवघ्या १९.५ षटकांत पूर्ण करत हा सामना जिंकला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -