Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा 'ही' खेळाडू संघाबाहेर; भारतीय क्रिकेट संघाला 'पाक'विरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का

‘ही’ खेळाडू संघाबाहेर; भारतीय क्रिकेट संघाला ‘पाक’विरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का

Subscribe

भारत आणि पाकिस्तान या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मृतीच्या हाताला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची नव्हती. तसेच, स्मृतीच्या हाताला फ्रॅक्चर झाले नव्हते. पण स्मृतीची ही दुखापत अजूनही बरी झाली नसल्याचे समजते.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यात खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्मृती मानधनाला संघाबाहेर जावे लागले आहे. (India Match Against Pakistan In Womens World Cup Vice-Captain Smriti Mandhana Ruled Out With Minor Finger Injury)

भारत आणि पाकिस्तान या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मृतीच्या हाताला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची नव्हती. तसेच, स्मृतीच्या हाताला फ्रॅक्चर झाले नव्हते. पण स्मृतीची ही दुखापत अजूनही बरी झाली नसल्याचे समजते. त्यामुळे ती आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. स्मृतीबाबत आता प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी माहिती दिली.

- Advertisement -

“पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर ही पूर्णपणे फिट आहे. पण स्मृतीला या सामन्यापूर्वी दुखापत झाली होती. स्मृतीच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची नव्हती. पण ती पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, पण ती या पुढील सामन्यांमध्ये मात्र खेळणार आहे”, असे भारताच्या महिला संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी यावेळी सांगितले.

स्मृती ही चांगल्या फॉर्मात असून, ती सातत्याने धावा करत होती. त्यामुळे तिला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले. स्मृती या विश्वचषकात कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. खासकरून भारतासाठी पाकिस्तानचा सामना महत्वाता होता. पण आता स्मृती या महत्वाच्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.


- Advertisement -

हेही वाचा – बोटाला मलम लावणं जडेजाला पडलं महागात; आयसीसीची मोठी कारवाई

- Advertisment -