घरक्रीडालक्ष्य ब्लॅक कॅप्सना व्हाईटवॉश देण्याचे

लक्ष्य ब्लॅक कॅप्सना व्हाईटवॉश देण्याचे

Subscribe

भारत-न्यूझीलंड शेवटचा टी-२० सामना आज

सलग दुसरा सुपर ओव्हर पर्यंत पोहोचलेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय संघाने पुन्हा एकदा खिशात टाकला.त्यानंतर भारतीय संघाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.त्यामुळे भारतीय संघाला ऐतिहासिक कामगिरी करत न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.तसेच भारताने हा सामना जिंकत ही मालिका ५-० अशी जिंकल्यास त्यांना क्रमवारीत एका स्थानाची बढती मिळण्याची शक्यता आहे. भारताचा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे.

हा अखेरचा सामना रविवारी माऊंट माउंगानुईला होणार आहे. दोन सामन्यांमध्ये केवळ एका-एका दिवसाचे अंतर असल्याने दोन्ही संघांना नेट्समध्ये सराव करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. भारत गोलंदाजांमध्ये लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या जागी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवचा संघात समावेश करण्याची शक्यता आहे. फलंदाज मनीष पांडेने चौथ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत सर्वांना प्रभावित केले. तो या सामन्यातही चांगली कामगिरी करण्यास नक्कीच उत्सुक असेल. मागील सामन्यात भारताने रोहित शर्माला विश्रांती दिली होती, पण या सामन्यात त्याचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

- Advertisement -

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलायन, कॉलिन मुनरो, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बॅनेट, ईश सोधी, टीम साऊथी, ब्लेअर टिकनर.

पंतला पुन्हा संधी ?

युवा खेळाडू ऋषभ पंतची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून समाधानकारक राहिलेली नाही.तरी देखील शेवटच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.तसेच विरेंद्र सेहवागसारख्या माजी खेळाडूंनी देखील पंतला संघात पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे.

सामन्याची वेळ : दुपारी १२.३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -