घरक्रीडाIND vs PAK Series: भारत-पाकिस्तान मालिकेवर लवकरच होणार निर्णय, PCB आणि BCCI...

IND vs PAK Series: भारत-पाकिस्तान मालिकेवर लवकरच होणार निर्णय, PCB आणि BCCI मध्ये होणार महत्वाची बैठक

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या मालिकेवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहेत. या बैठकीत चारही देशातील मालिकेवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबद्दल खूप उत्सुक आहेत. या बैठकीत भारत आणि पाक यांच्यातील बैठकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही बैठक क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुबईत होणार आहे. दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीसाठी बीसीसीआय आणि पीसीबीचे अधिकारी दुबईला पोहोचले आहेत.

- Advertisement -

७ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान ही बैठक होणार आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, यावेळी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आपापसात चर्चा करून द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेतील. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून चार देशांच्या टी-२० मालिकेबाबतचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.

भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार देशांमधील टी-२० मालिकांबाबत प्रस्ताव मांडला जाणार आहे. मात्र, भारताकडून याआधीही अनेकदा असे सांगण्यात आले आहे की, अशी कोणतीही मालिका होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतासोबत द्विपक्षीय मालिकेसाठी अनेकदा स्वारस्य दाखवले आहे, मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी संमती दिलेली नाही. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होण्याची शक्यता कमी आहे, असं म्हटलं जातंय.

- Advertisement -

२०१३ मध्ये झाली होती भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची मालिका

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१३ मध्ये झाली होती. पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने भारताचा सहा गडी राखून पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात ८५ धावांनी विजय मिळवला. मात्र, अखेरचा सामना भारताने १० धावांनी जिंकला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि एकही मालिका झाली नाही. आता दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका पुन्हा एकदा खेळल्या जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६!; पॅट कमिन्सची तुफानी खेळी, १४ चेंडूंत ठोकलं अर्धशतक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -