पाकिस्तानचे टी-20 विश्वचषकातील भविष्य भारताच्या हाती; वाचा नेमके कसे?

टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभूत झाला. पहिला भारतासोबत आणि दुसरा झिबॉम्बेसोबत पराभूत झाला. या दोन पराभवांनंतर पाकिस्तानचे भविष्य भारताच्या हाती आले आहे.

india and pakistan in same group for icc t20 world cup

टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभूत झाला. पहिला भारतासोबत आणि दुसरा झिम्बाब्वेसोबत पराभूत झाला. या दोन पराभवांनंतर पाकिस्तानचे भविष्य भारताच्या हाती आले आहे. यामागचे कारण म्हणजे भारताच्या सामन्यांवरच आता पाकिस्तानचे सेमी फायनलचे तिकीट निश्चित होऊ शकते, असे समीकरण समोर आले आहे.

काय आहे ते समीकरण ?

भारतीय संघाने टी-20 विश्वचषकातील आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारत गुणतालिकेत 4 गुणांसह ते अव्वल स्थानावर आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांचे तीन सामने शिल्लक आहेत. या तिन्ही सामन्यांत जर भारताने विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होऊ शकतात आणि ते सहजपणे सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात.

दुसरीकडे पाकिस्तानलाही आपले तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. ते पाकिस्तानसाठी बंधनकारक असेल. जर पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे 6 गुण होतील. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांनी जर सर्व सामने जिंकले दक्षिण आफ्रिकेचे 5 गुण होतील आणि ते तिसऱ्या स्थानावर राहतील. त्याचबरोबर झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि बांगलादेशचे संघही अंतिम दोन संघांत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विजय मिळवले तर त्यांना सेमी फायनलमध्ये सहजपणे पोहोचता येईल.

त्यामुळे या समीकरणानुसार पाकिस्तान तिन्ही सामने जिंकत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – भारत काही ‘तीस मार खां’ नाही, पुढच्या आठवड्यात परतणार; पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर बरळला