आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताची खेळाडूंकडून पदकांची लयलूट कायम आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी नेमबाजीत दमदार सुरूवात केली. भारताची नेमबाज सिफ्ट कौर समराने वैयक्तिकरित्या यश मिळवले आहे. तिने 50 मीटर रायफल पोझिशन्स वैयक्तिक इव्हेंटमध्ये प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदाकाला गवसणी घातली. सुवर्णपदकासह तिने जागतिक विक्रमही केला आहे. सिफ्ट कौर समरा हिने 10.2 च्या शेवटच्या शॉटनंतर 469.6 गुणांसह जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान, आज पुरुषांच्या स्कीट सांघिक स्पर्धेत भारतानं कांस्यपदक जिंकलं आहे. (India s Sift Kaur Samara won gold and Ashi Chowks bronze in 50m rifle 3 position event)
सिफ्ट कौरचा विश्वविक्रम
50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौरनं 469.6 गुणांसह विश्वविक्रम केला. या विक्रमासह सिफ्टनं 462.3 गुणांसह चीनच्या झांग क्विओंग्यूचा पराभव केला. अशाप्रकारे सिफ्टनं मोठ्या फरकानं सुवर्ण जिंकलं. तर आशी चोक्सीने 451.9 गुणांसह कांस्यपदक जिंकलं. आशीच्या खराब शॉटनं तिला रौप्यपदकापासून दूर नेलं. त्यानंतर तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
भारताला मिळालं पाचवं गोल्ड
भारताच्या पारड्यात सिफ्टनं आणखी एका गोल्डची भर घातली असून भारताला आतापर्यंत पाच सुवर्णपदकं मिळाली आहेत. सिफ्टनं भारतासाठी पाचवं आणि आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दुसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. यापूर्वी 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये मनु भाकर, ईशा सिंह आणि रिदम सांगवान या तिघींनी सुवर्ण कामगिरी केली होती. देशाचं चौथं आणि आजचं पहिलं गोल्ड होतं.
चीनमधील हांगझोऊ येथे 19 व्या आशियाई क्रीड स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होत आहेत. या कालावधीत 40 खेळाडूंमध्ये एकूण 482 स्पर्धा होत आहेत. ज्यात 10 हजारहून अधिक 45 देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे.
(हेही वाचा: संघाचे एकच लक्ष्य वर्ल्डकप जिंकण्याचे; कर्णधार रोहित शर्माने बोलून दाखवला निश्चय )