घरक्रीडाIND vs ENG : पहिल्या टी-२० सामन्यात भारताने पंतला संधी द्यावी; 'या' माजी...

IND vs ENG : पहिल्या टी-२० सामन्यात भारताने पंतला संधी द्यावी; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पंतला संघातून वगळण्यात आले होते.

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात फॉर्मात असलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला संधी दिली पाहिजे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणला वाटते. भारताने यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी झालेल्या टी-२० मालिकेसाठी पंतला संघातून वगळण्यात आले होते. परंतु, त्याने मागील काही कसोटी सामन्यांत दमदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत दोन मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला सलामीच्या सामन्यात संधी मिळाली पाहिजे, असे मत लक्ष्मणने व्यक्त केले.

सूर्याला संघात स्थान मिळणे अवघड

भारताची मधली फळी मजबूत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन यांना पहिल्या सामन्यात संधी मिळेल असे मला वाटत नाही. भारताने संघात फार बदल करणे टाळले पाहिजे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मी श्रेयस अय्यरला पसंती देईन. तसेच पहिल्या सामन्यात भारताने रिषभ पंतला संधी दिली पाहिजे. तो पाचव्या क्रमांकावर खेळू शकेल आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या खेळेल. त्यामुळे सूर्यकुमार आणि किशन यांना, तसेच राहुल तेवातियाला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणे थोडे अवघड आहे. मात्र, त्यांना जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ते त्या संधीचे सोने करतील असा मला विश्वास आहे, असे लक्ष्मण म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -