घरक्रीडाInd vs SA : दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 9 धावांनी...

Ind vs SA : दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 9 धावांनी पराभव

Subscribe

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात आफ्रिकेने 9 धावांनी भारताचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 240 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूंना चांगली सुरूवात करता आली नाही.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात आफ्रिकेने 9 धावांनी भारताचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 240 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूंना चांगली सुरूवात करता आली नाही. त्यामुळे 40 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघ केवळ 8 गड्यांच्या मोबदल्यात 240 धावा करू शकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (India south Africa 1st odi match Lucknow)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मलिकेतील पहिला सामना गुरूवारी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झाला. मात्र, कालच्या पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना 40 षटकांचा खेळवण्यात आला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी 40 षटकांत 240 धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि यानेमन मलान यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

त्यानंतर कर्णधार टेम्बा बवूमा आणि एडन मार्करम स्वस्तात बाद झाले. बवुमाला शार्दुल ठाकूरने 8 धावांवर क्लीन बोल्ड केले. तर मार्करमला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने बाद केले. शिवाय, मार्करम शुन्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर क्विंटन डी कॉक हा देखील 54 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. डीकॉक बाद झाल्यानंतर मात्र, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली.

डेव्हिड मिलर 63 चेंडूत 75 आणि हेनरिक क्लासेन 65 चेंडूत 74 धावा करूत नाबाद राहिले. दोघांमध्ये 106 चेंडूत 139 धावांची भागीदारी झाली. या भागिदारीच्या जोरावरच आफ्रिकेने 249 धावसंख्येपर्यंत मजल मारली. तर भारताकडून शार्दुल ठाकूरने 35 धावांत सर्वाधिक 2 बळी घेतले.

- Advertisement -

भारताकडून संजू सॅमसनने 63 चेंडूत 86 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 9 चौकार आणि 3 षटकार खेचले. त्याचवेळी उपकर्णधार श्रेयस अय्यरने 50 धावा केल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पुढील वनडे सामना 9 ऑक्टोबर रोजी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


हेही वाचा – ‘भगवान राम तुमचे जीवन भरभराट…’ दसऱ्याच्या शुभेच्छा देताच शमीला कट्टरवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -