घरक्रीडागब्बर इज बॅक!

गब्बर इज बॅक!

Subscribe

धवन, हार्दिकचे वनडे संघात पुनरागमन,भारत-दक्षिण आफ्रिका मालिका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी सलामीवीर शिखर धवन, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यातील एकदिवसीय मालिका भारतीय संघाने ०-३ अशी गमावली होती. आता या अनुभवी त्रिकुटाच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ मजबूत झाला आहे. सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच भारताचा संघ निवडण्यात आला.

यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती. तर हार्दिकने आपला अखेरचा एकदिवसीय सामना मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात खेळला होता. मात्र, त्याने डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत दमदार पुनरागमन करताना दोन शतके लगावली. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणार हे निश्चितच मानले जात होते. उपकर्णधार रोहित शर्माच्या पायाची दुखापत अजून पूर्णपणे बरी न झाल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. अनुभवी केदार जाधव, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांना संघातून वगळण्यात आले आहे. युवा फलंदाज शुभमन गिलला मात्र संधी मिळाली आहे. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉने आपले स्थान राखले आहे.

- Advertisement -

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, रिषभ पंत, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.

असे होणार सामने – पहिला सामना धर्मशाळा (१२ मार्च), दुसरा सामना लखनऊ (१५ मार्च) आणि तिसरा सामना कोलकाता (१८ मार्च).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -