घर क्रीडा border gavaskar trophy : अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

border gavaskar trophy : अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

Subscribe

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताने 2-0 अशा फरकाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्यानंतर आता अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताने 2-0 अशा फरकाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्यानंतर आता अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या दोन सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. (india squads for last two tests of border gavaskar trophy and odi series announced)

बीसीसीआयने अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी पहिल्या दोन सामन्यातील संघच कायम ठेवला आहे. संघात कोणताही बदल केला नाही. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय ईशान किशनही संघाचा भाग आहे.

- Advertisement -

नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 2-0 ने आघाडीवर आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने आज टीम इंडियाची निवड केली आहे.

भारतीय संघ –

- Advertisement -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

सामना                                तारीख                    ठिकाण

पहिला कसोटी सामना        9-13 फेब्रुवारी 2023          नागपूर
दुसरा कसोटी सामना         17-21 फेब्रुवारी 2023        दिल्ली
तिसरा कसोटी सामना        1-5 मार्च 2023               धर्माशाला
चौथा कसोटी सामना          9-13 मार्च 2023            अहमदाबाद

वनडे मालिका

सामना                                तारीख                      ठिकाण

पहिला एकदिवसीय सामना      17 मार्च 2023                 मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना      19 मार्च 2023               विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना      22 मार्च 2023                  चेन्नई


हेही वाचा – Ind vs Aus : ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत भारताची कसोटी मालिकेत २-०ने आघाडी

- Advertisment -