घरक्रीडास्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

Subscribe

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासंदर्भात सानियाने एक भावनिक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. 16 जानेवारीपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही सानियाची अखेरची स्पर्धा असणार आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर सानिया तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार आहे. तसेच त्याला माझी अधिक गरज असल्याचं सांगत तिने निवृत्ती घेतली आहे.

30 वर्षांपूर्वी हैदराबादमधील एक सहा वर्षांची मुलगी पहिल्यांदा टेनिस कोर्टवर तिच्या आईसोबत गेली होती. त्यावेळी टेनिस कसं खेळतात हे माझ्या प्रशिक्षकांनी पहिल्यांदा समजावून सांगितलं होतं. मला वाटत होते की, मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. माझ्या स्वप्नांचा लढा वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाला, अशा आशयाची भावनिक पोस्ट लिहित सानियाने निवृत्ती जाहीर केली. सानियाने केलेल्या पोस्टमध्ये तिच्या बालपणीच्या फोटोंसह तरुणपणीचे फोटोही दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

- Advertisement -

माझे आई-वडील, बहिण, कुटुंब, प्रशिक्षक, फिजिओसह माझ्या पाठिशी उभ्या असलेल्या संपूर्ण टीमविना आजवरचा प्रवास शक्य झालाच नसता. ही सर्व मंडळी माझ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात माझ्यासोबत उभी होती, असंही सानियाने म्हटलं आहे.

- Advertisement -

सानिया मिर्झाने महिला दुहेरीत 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते. तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. पण सानिया मिर्झाने टेनिस करिअरमध्ये कधी सिंगल ग्रँडस्लॅम जिंकलेलं नाही. पण डबल्समध्ये तिनं सहावेळा चॅम्पियनशीप मिळवली आहे. डबल्समध्ये ज्या सहा ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत, त्यातील तीन महिला डबल्स आणि तीन मिक्स्ड डबल्स स्पर्धा जिंकल्या आहेत.

2012 मध्ये तिने फ्रेंच ओपनचे मिश्र दुहेरी जिंकले. तर 2014 मध्ये तिने यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. मात्र, ऑस्ट्रेलिया ओपन 2023 हे तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे तिने स्पष्ट केले होते. अखेर सानियाने आज निवृत्तीची घोषणा करत एक भावनिक पोस्टही शेअर केली.


हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेच्या हाशिमने हिंदूंना मुस्लीम बनवलं, माजी पाक क्रिकेटपटूचा मोठा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -