आयर्लंड : भारत आणि आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यांतील पहिल्या पारीत भारताने आयर्लंडसमोर 186 धावांचे लक्ष्य ठवले आहे. आधी निराशाजन सुरूवात करणाऱ्या भारतीय संघाने समाधानकार धावांचे लक्ष्य आयर्लंडसमोर ठेवले आहे.(India target 186 against Ireland after disappointing start Rituraj Gaigwads half century)
दुसऱ्या टी-20 सामन्यांत आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कर्णधारांनी आपल्या संघात कोणताही बदल न करताना मैदानात उतरले होते. यावेळी भारतीय संघाकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवाल दुसऱ्याही टी 20 सामन्यात चांगली सुरूवात करून बाद झाला. त्याला क्रेग यंगने 18 धावांवर बाद केले.
तिलक वर्मा एका धावांवर बाद
यशस्वी जैसवाल 18 धावा करून बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा 2 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. दरम्यान, जम बसलेल्या ऋतुराज गायकवाडने संजू सॅमसनच्या साथीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची दमदार भागीदारी केली. मात्र संजू सॅमसन 26 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत भारताला 15 षटकात 129 धावांपर्यंत पोहचवले.
हेही वाचा : Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे दमदार कमबॅक; भारतासमोर 140 धावांचे आव्हान
ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक
भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंविरूद्ध विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा चोपल्या. संजू आणि ऋतुच्या 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूत 38 धावा करत भारताला 180 च्या पार पोहचवले. त्याला शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा करत चांगली साथ दिली.