India vs England Test : तिसऱ्या कसोटीसाठी बुमराह तयार

भारता आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टेस्ट मॅचेसच्या मालिकेत पहिल्या २ टेस्ट मॅच पराभूत झाल्यानंतर आता तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा स्टार बॉलर बुमराह पुन्हा संघात परतनार आहे, आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो आतापर्यंत संघाबाहेर होता. मात्र आता तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे.

jasprit B
जसप्रीत बुमराह

भारतविरूद्ध इंग्लंडच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत भारत काही खास कामगिरी करू शकला नाहीये. भारताला पहिल्या सामन्यात ३१ धावांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारताला काही खास कामगिरी करता आली नाही आणि इंग्लंडने भारतावर तब्बल १ डाव आणि १५९ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. दोन्ही कसोटी सामन्यात भारताची बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यावर भारतीय संघ निष्प्रभ ठरला. त्यामुळेच जसप्रीतला पुन्हा संधी देण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. बुमराहच्या संघात खेळण्याबाबतची माहिती क्रिडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलद्वारे दिली आहे.

वाचा – India vs England Test : दुसऱ्या कसोटीतही भारत पराभूत

अशी झाली होती बुमराहला दुखापत

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी भारत आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात बॉलिंग दरम्यान बुमराहच्या अंगठ्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यानंतर त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील एकही सामना बुमराह खेळू शकला नाहीये. तर दुसरीकडे भारताची बॉलिंगही काही खास कामगिरी करू शकली नसल्याने आता बुमराहच्या संघात परत येण्याने भारत काय कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

jasprit bumrah
जसप्रीत बुमराह

भारतासाठी मालिकेत राहण्याची शेवटची संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिले दोन सामने भारताच्या हातातून निसटले आहेत. त्यामुळे मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला तिसरी कसोटी जिंकण्याची गरज आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर इंग्लंड ३ च्या फरकाने आघाडी घेईल आणि मालिकाही जिंकेल. त्यामुळे भारताला मालिकेत टिकण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

england vs india
इंग्लंडविरूद्ध भारत