घरICC WC 2023India vs AUS Final: अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर कमेंट केल्यानं हरभजन...

India vs AUS Final: अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर कमेंट केल्यानं हरभजन सिंग अडचणीत, युझर्स म्हणाले- माफी माग

Subscribe

IND Vs AUS Final: हरभजन सिंग, टीम इंडियाचा माजी ऑफ-स्पिनर आणि वर्ल्ड कप 2023 मध्ये हिंदी कॉमेंट्री करणारा, अंतिम सामन्यादरम्यान त्याच्या एका टिप्पणीमुळे वादात सापडला आहे.

नवी दिल्ली: IND Vs AUS Final: हरभजन सिंग, टीम इंडियाचा माजी ऑफ-स्पिनर आणि वर्ल्ड कप 2023 मध्ये हिंदी कॉमेंट्री करणारा, अंतिम सामन्यादरम्यान त्याच्या एका टिप्पणीमुळे वादात सापडला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स आले होते, त्यात अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांचा समावेश होता. दोघेही आपापले पती विराट कोहली आणि केएल राहुल यांना सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. (India vs AUS Final Harbhajan Singh in trouble for commenting on Anushka Sharma and Athiya Shetty users said please apologize)

- Advertisement -

हरभजन सिंगने अनुष्का-अथियावर साधला निशाणा

सामन्याची हिंदी कॉमेंट्री करत असलेल्या हरभजन सिंगने त्याच्या संभाषणात काहीतरी सांगितले, ज्यामुळे तो आता सोशल मीडिया युझर्सच्या रडारवर आला आहे. खरंतर, मॅचदरम्यान, अनुष्का आणि अथिया कॅमेरा त्यांच्यावर असताना एकमेकांशी बोलताना दिसल्या. यादरम्यान हरभजन सिंग म्हणाला, ” या दोघी नक्कीच चित्रपटांविषयी बोलत असतील, कारण मला माहीत आहे की यांना क्रिकेटबद्दल किती समज असेल, हरभजनने केलेल्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हरभजनवर चाहते संतापले

हरभजन सिंगच्या या वक्तव्यामुळे युझर्सनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करताना एका चाहत्याने कमेंट केली की, ‘हरभजन सिंग, महिलांना क्रिकेट समजते की नाही हे तुम्हाला काय म्हणायचे आहे? कृपया त्वरित माफी मागावी.

- Advertisement -

एका यूझरने लिहिले की, ‘भाई कधी सुधारणार? ती फक्त अनुष्का नाही तर नुकताच इतिहास रचणारी विराट कोहलीची पत्नी आहे. एवढ्या लोकांसमोर एखाद्याची चेष्टा करणे, ते सुद्धा खूप लोक बघत असताना, खूप असभ्य आहे.

(हेही वाचा: World Cup 2023: भारताच्या पराभवानंतर खचला विराट कोहली; अनुष्का शर्माने पतीला मिठी मारून दिली हिंमत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -