घरक्रीडाIND vs AUS : दुसऱ्या वनडे सामन्यासाठी 'असा' असेल भारताचा प्लेइंग 11...

IND vs AUS : दुसऱ्या वनडे सामन्यासाठी ‘असा’ असेल भारताचा प्लेइंग 11 संघ?

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला असून, या सामन्यात भारताने 5 गडी राखत ऑस्ट्रेलियांचा पराभव केला. पहिल्या विजयानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला असून, या सामन्यात भारताने 5 गडी राखत ऑस्ट्रेलियांचा पराभव केला. पहिल्या विजयानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्यामुळे या सामना जिंकत भारत ही मालिकेवर विजय मिळवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, या सामन्यातून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करणार आहे. (india vs australia 2nd odi playing 11 ind vs aus prediction live streaming)

दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर रोहित आणि गिल सलामीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. तसेच, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल मधल्या फळीत उतरण्याची शक्यता आहे. शिवाय, कर्णधार हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा आणि इतर 2 अष्टपैलू खेळाडूंसह भारतीय संघाला मैदानात उतरू शकते. दुसरीकडे, दुसऱ्या वनडेसाठी गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले+ तर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतात. तर स्पिनर कुलदीप यादवचाही संघात समावेश केला जाऊ शकतो.

- Advertisement -

कुठे पाहाल सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. शिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 :

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संघाची संभाव्य प्लेइंग 11 :

ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा.


हेही वाचा – भारताच्या विजयात राहुल चमकला; जडेजा, शमी, सिराज यांचा प्रभावी मारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -