घरक्रीडाभारताचा कसोटी कारकिर्दीतील १५० वा विजय; ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव

भारताचा कसोटी कारकिर्दीतील १५० वा विजय; ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी भारताने १३७ धावांनी जिंकली असून भारताचा कसोटी कारकिर्दीतील १५० वा विजय ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी भारताने १३७ धावांनी जिंकली आहे. कोहली ब्रिगेडने या विजयासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने तब्बल ३७ वर्षानंतर कसोटी सामना जिंकला आहे. तर या विजयामुळे भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाच्या झरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवण्याची समधी उपलब्ध झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील १५० वा विजय ठरला आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद करत २५८ धावांपर्यंत मदल मारली होती. मात्र त्यानंतर भरताकडून जाडेजा, बुमराहने सर्वाधिक ३-३ बळी टिपले आणि सामन्यात ९ बळी टिपणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले आहे.

- Advertisement -

असा रंगला खेळ

भारतीय गोलंदाजांनी या कसोटी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. भारताने दुसरा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला. पहिल्या डावात ८ धावांनी बाद झालेला सलामीवीर फिंच दुसऱ्या डावात केवळ ३ धावाच करु शकला. बुमराहने पहिल्या डावातील धडाका दुसऱ्या डावातही कायम ठेवला आणि फिंचच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर हॅरिस फॉरवर्ड शॉर्ट लेग झेलबाद झाला. त्याने १ चौकार लगावत १३ धावा केल्या. उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४४ धावांच्या मोबदल्यात २ गडी गमावले. त्यानंतर ख्वाजा ३३ तर शॉन मार्श ४४ धावांवर बाद झाला. शॉन मार्शनंतर बंधू मिचेल मार्श देखील फटकेबाजीच्या नादात १० धावांवर बाद झाला. त्यामुळे नंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३८ अशी झाली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला ट्रेव्हिस हेड ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन २६ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ मिचेल स्टार्क त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाकडून सामान्यात एकमेव अर्धशतक लगावणाऱ्या पॅट कमिन्सने एकाकी झुंज दिली. पण तो ६३ धावांवर बाद झाला. अखेर भारताने दुसऱ्या डावात दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६१ धावांमध्ये आटोपला. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन भारताला विजय प्राप्त करुन दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -