घरक्रीडाindia vs australia 4th test: ऋषभ पंतनंतर शार्दुल ठरला उत्कृष्ट फलंदाज

india vs australia 4th test: ऋषभ पंतनंतर शार्दुल ठरला उत्कृष्ट फलंदाज

Subscribe

सातव्या स्थानावरील खेळाडूसाठी ठरली सर्वात मोठी भागिदारी

भारतीय संघाचा खेळाडू आणि मराठमोळा शार्दूल ठाकूरने आपल्या दमदार फलंदाजीने भारतीय संघाला मोठा दिलासा दिला आहे. शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीने उत्कृष्ट फलंदाजी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले आहे. या दोघांच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाने २५० धावांची मजल मारली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात आघाडीचे सहा गडी बाद झाल्याने भारतीय संघाच्या समोरील अडचणी वाढल्या होत्या परंतु सातव्या स्थानावरील जोडीनं भारतीय संघासाठी सर्वात मोठी भागिदारी केली आहे. तसेच ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या स्थानावरील खेळाडूसाठी ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

भारतीय संघाचे खेळाडू शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीने १२४ चेंडूंचा सामना करत ६७ धावा काढल्या. संकटसमयी शार्दूल आणि सुंदर यांनी आपले कसब दाखवत उत्कृष्ट खेळी करुन टीम इंडियाला सावरले आहे. तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने २७ षटकांत ९२ धावा काढल्या या दरम्यान दोन गडी बाद झाले होते. तसेच संघाने ८७ षटकांनतर २५३ धावा काढल्या यादरम्यान ६ गडी बाद झाले आहेत. भारताकडे आता ४ गडी भाकी आहेत. तसेच भारताकडे ४ गडी बाकी असून ३१५ धावा काढल्या आहेत. तर ५४ धावांनी पिछाडीवर आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -