घरक्रीडालष्कराचा सन्मान: लष्कराची कॅप घालून मैदानात उतरली टीम इंडिया

लष्कराचा सन्मान: लष्कराची कॅप घालून मैदानात उतरली टीम इंडिया

Subscribe

ऑस्ट्रेलियाच्या 'पिंक टेस्ट' आणि साऊथ अफ्रिकेच्या 'पिंक वनडे' च्या धर्तीवर यापुढं दरवर्षी भारतात होणाऱ्या पहिल्या सामन्यात अशाच प्रकारे टोपी घालून भारतीय जवानांना मानवंदना दिली जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, रांची येथे आज होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आजचा हा सामना खूप खास आणि आगळावेगळा आहे. त्याच्या मागचे कारण म्हणजे आजच्या सामन्यात भारतीय खेळाडू लष्कराची ‘कॅप’ घालून मैदानात उतरले आहेत. सामना सुरु होण्याआधी खुद्द महेंद्र सिंह धोनी याने टीम इंडियाच्या खेळाडूंना ही कॅप दिली. भारतीय जवानांची उत्कृष्ट कामगिरी आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देण्यासाठी भारतीय खेळाडू लष्कराची कॅप घालून मैदानात उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

दरवर्षी प्रत्येक सामन्यात घालणार कॅप

भारतीय जवानांचे पराक्रम, बलिदान आणि धाडसाचा सन्मान करण्यासाठी स्वत: बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ऐवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या ‘पिंक टेस्ट’ आणि साऊथ अफ्रिकेच्या ‘पिंक वनडे’ च्या धर्तीवर यापुढं दरवर्षी भारतात होणाऱ्या पहिल्या सामन्यात अशाच प्रकारे टोपी घालून भारतीय जवानांना मानवंदना दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला ही कल्पना मेहंद्र सिंह धोनी आणि कॅप्टन विरोट कोहलीकडून देण्यात आली होती. महेंद्र सिंह धोनी प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नल राहिले आहेत. बीसीसीयाद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्वत: महेंद्र सिंह धोनी टीम इंडियाच्या खेळाडूंना टोपी वाटताना दिसत आहे.

धोनीचे लष्कराप्रती प्रेम 

विशेष म्हणजे जेव्हा सामन्याला सुरुवात झाली त्यावेळी कॅप्टन विरोट कोहलीने सांगितले की, भारतीय संघ या सामन्यातून मिळणारा धनादेश नॅशनल डिफेन्सला दान करणार आहेत. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदतीचे आवाहन केले आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील लष्कराच्याप्रती धोनीचे प्रेम सर्वांना माहिती आहे. त्यासाठी धोनीने या नव्या उपक्रमाची सुरुवात त्याच्या होम ग्राऊंड रांचीपासून सुरुवात केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे असेही सांगितले की, जर धोनीने क्रिकेट सोडल्यानंतर फुल टाइम सेनेमध्ये भरती झाला तर त्यामध्ये काहीच चिंतेची बाब नाही.

- Advertisement -

लष्कराचे सर्वस्तरावरुन कौतुक

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानचा बदला घेतला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघनटनेचे तळ उध्वस्त केले होते. भारतीय सैन्याच्या या कामगिरी आणि धैर्याचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे. त्याचसोबत पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देशभरातून अनेक हात पुढं येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. बीसीसीआय देखील यात पुढाकार घेत निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -