Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा बोटाला मलम लावणं जडेजाला पडलं महागात; आयसीसीची मोठी कारवाई

बोटाला मलम लावणं जडेजाला पडलं महागात; आयसीसीची मोठी कारवाई

Subscribe

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १ डाव १३२ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या सामन्यात भारताचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी कमालीची गोलंदाजी केली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १ डाव १३२ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या सामन्यात भारताचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी कमालीची गोलंदाजी केली. परंतु असे असले तरी सामन्यानंतर रविंद्र जडेजाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. (India vs Australia India star handed penalty for ICC Code of Conduct charge during first Test against Australia)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जडेजावर ऑस्ट्रेलियान मीडियाने बॉल टॅम्परिंग म्हणजेच चेंडू कुरतडण्याचे आरोप लावले. एक व्हिडीओ ऑसींकडून व्हायरल करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये जडेजा बोटावर मलम लावून गोलंदाजी करत असल्याचा दावा केला.

रेफरींकडून या व्हिडीओबाबत भारतीय संघाच्या व्यवस्थापनाशी व कर्णधार रोहित शर्माशी चर्चा झाली. त्यांनी जडेजावरील आरोप रद्द केले. पण, आयसीसीने जडेजाला त्याच्या मॅच फी मधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली अन् एक उणे गुण (Demerit point) दिला गेला. जडेजाची ही लेव्हल १ ची चूक होती आणि त्याने कलम २.२० चे उल्लंघन केले.

- Advertisement -

भारतीय संघाने पहिल्या कसोटीत एक डाव व १३२ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४०० धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या २२३ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ९१ धावा करता आल्या.

आर अश्विनने ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जडेजाने फलंदाजीतही ७० धावांचे योगदान दिले.


हेही वाचा – IND vs AUS: सामन्यादरम्यान जडेजा आणि सिराजची नवी खेळी, ऑस्ट्रेलियाचा गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल…

- Advertisment -