घरक्रीडाIndia vs Australia Indore Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात

India vs Australia Indore Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात

Subscribe

मुंबई : इंदौर येथे सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. त्यांनी ८८ धावांची आघाडी घेतली आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाच्या ४ विकेट आणि १५६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, परंतु भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये फक्त ४१ धावांच जोडू शकली. पीटर हैंड्सकॉम्ब (१९), तर कैमरन ग्रीन (२१) धावा करून बाद झाल्यानंतर शेवटचे फलंदाज दहाचा आकडाही गाठू शकले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट, तर अश्विन आणि उमेश यादव यांना प्रत्येकी ३ विकेट मिळाल्या.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे उसमाना ख्वाजाने मार्नस लॅबुशेनच्या सोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली होती. उसमान ख्वाजा सर्वाधिक ६० धावा, तर मार्नस लॅबुशेन ३१ धावा करू बाद झाल्यानंतर कर्णधार स्टीव स्मिथने (२६) धावांचे योगदान दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने ४ विकेट गमावून १५६ धावा करत ४७ धावांची आघाडी घेतली होती.

भारताचा पहिला डाव
तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी गुडघे टेकण्यास मजबूर केल्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव 33.2 षटकात 109 धावांवर संपुष्टात आला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ५२ चेंडूंत सर्वाधिक २२ धावा केल्या. याशिवाय खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.

- Advertisement -

मैथ्यू कुहनेमैनची फिरकी जादू
आपल्या वैयक्तिक दुसऱ्याच कसोटी सामन्यात मैथ्यू कुहनेमैन याने फक्त ९ षटकात २ निर्धाव षटक टाकताना फक्त १६ धावा देत सर्वाधिक ५ विकेट घेण्याची किमया केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -