घरक्रीडाऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी रचला इतिहास, पिंक बॉल टेस्टमध्ये 'स्मृर्ती मानधना'चं शतक

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी रचला इतिहास, पिंक बॉल टेस्टमध्ये ‘स्मृर्ती मानधना’चं शतक

Subscribe

स्मृर्ती मानधनाने पहिल्याच खेळीच जबरदस्त कामिगीरी करत नाबाद ८० धावा केल्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia)  पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये स्मृती मानधनाने (Smriti Manadhana ) शतक मिळवले आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकवणारी स्मृर्ती ही पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये स्मृर्ती मानधानाने एक नवीन विक्रम रचला आहे. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच पिंक बॉल टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरला होता आणि पहिल्याच दिवशी त्यांनी इतिहास रचत स्मृर्ती मानधनाने ऐतिहासिक कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचे निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने तीन मॅचचे वन डे सामने २-१ नी जिंकले. इंडियाने मात्र शेवटचा वन डे सामना जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना काल पावसामुळे थांबवण्यात आला होता.

- Advertisement -

परंतु स्मृर्ती मानधनाने पहिल्याच खेळीत जबरदस्त कामगिरी करत नाबाद ८० धावा केल्या. तर भारताची सलामीवीर शफाली हिने ६४ बॉल्समध्ये ३१ धावा केल्या. तर ४ चौफेर मारले. शफाली आणि स्मृर्ती यांनी एकूण मिळून ९३ धावा केल्या. शफाली आऊट झाल्यानंतर पूनम राऊत आणि स्मृर्ती यांनी खेळाला सुरुवात केली. ५५ ओव्हर्समध्ये स्मृर्तीने नाबाद १०२ रन्स काढले तर पूनमने १९ रन्स केले. पहिल्याच दिवशी पिंक बॉल टेस्ट बॉलमध्ये महिलांच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकून घेतली.

महिला क्रिकेटच्या इतिहासात खेळवला गेलेला हा दुसरा कसोटी सामना आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने अॅशेस २०१७ साली पहिल्यांदा पिंक बॉल टेल्ट सामना खेळला होता. भारतीय महिला संघानी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर देशभरातून महिला संघाचे कौतुक करण्यात येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Drag Flicker : रूपिंदर पाल सिंहची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -