घरक्रीडाआश्चर्य! ३ऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन संघात खेळणार ७ वर्षांचा मुलगा

आश्चर्य! ३ऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन संघात खेळणार ७ वर्षांचा मुलगा

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. दोन सामने झाले असून भारत आणि ऑस्ट्रेलियाने एक कसोटी जिंकलेली असून दोन्ही संघ बरोबरीत आहेत. २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरु होणाऱ्या कसोटीसाठी भारताने एका बाजुला हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवालला संघात स्थान दिले आहे. मात्र यावेळी चर्चा होतेय ती ऑस्ट्रेलियाने संघात स्थान दिलेल्या ७ वर्षीय लेग स्पिनरचीच. आर्ची शिलर असे या लेग स्पिनरचे नाव आहे. फक्त संघातच नाही तर छोट्या आर्चीला उपकर्णधारपदही बहाल करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेने आर्चीच्या सातव्या वाढदिवसानिमित्त त्याला संघात समाविष्ट केल्याची घोषणा केली. तसेच आर्चीसोबत नेट प्रॅक्टिस केल्याचे फोटोही क्रिकेट ऑस्ट्रलियाने ट्विट केले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

आर्चीला खेळवण्याचे हे खास कारण

आता तुम्ही विचार कराल. सात वर्षांच पोर. त्याला कशाला घेतलं संघात. तो काय करणार किंवा तो मोठ्या वयाच्या खेळांडूसमोर टिकणार का? तर याचे कारणही तेवढेच खास आहे. ‘मेक अ विश ऑस्ट्रेलिया’ या अभियानातंर्गत हे शक्य झाले आहे. अवघड परिस्थितीचा सामना करणाऱ्या विशेष मुलांना त्यांची इच्छा पुर्ण करण्याची संधी दिली जाते.
आर्ची तीन महिन्यांचा असतानाच त्याला हृदयाचा आजार असल्याचे समोर आले होते. मेलबर्न येथे त्याच्या हृदयावर पहिल्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जी सात तास चालली होती. मात्र शस्त्रक्रियेच्या सहा महिन्यांनंतरच त्याला पुन्हा हृदयाशी निगडीत त्रास सुरु झाला. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याच्यावर तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी काहीही होऊ शकते असे आर्चीच्या कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे त्याचे आई वडील चागंलेच घाबरले होते.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन हा आर्चीची संघात निवड केल्यानंतर म्हणाला की, “आर्ची आणि त्याच्या कुटुंबियांनी खुप त्रास सोसला आहे. त्याच्या वडिलांना जेव्हा त्याची इच्छा विचारली गेली तेव्हा ते म्हणाले की आर्चीला ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार व्हायचे आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिला संघात घेतल्यास इतरांनाही खेळण्याची प्रेरणा मिळते. तो संघात आल्याने आम्हाला आनंद झाला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -