U 19 World Cup: बांगलादेश पहिल्यांदाच विश्वविजेता

bangladesh wins under 19 world cup
बांगलादेश अंडर १९ विश्वविजेता

उपांत्य फेरीत पाकिस्तानला नमवून अंतिम फेरी गाठलेल्या भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाला अंतिम सामन्यात यश मिळवण्यात अपयश आले आहे. बांगलादेशने तीन विकेट राखून डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे अखेरचा सामना जिंकत विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं आहे. पाचव्यांदा जगज्जेता होण्याचे भारताचे स्वप्न मात्र भंगले. विश्वचषकाची अंतिम फेरी ही अतिशय उत्कंठावर्धक अशी झाली. पहिल्यादा फलदांजी करताना बांगलादेशने टिच्चून गोलदांजी केली. भारताकडून यशस्वी जैस्वालने ८८ धावांची बहारदार खेळी केली. मात्र त्याव्यतिरीक्त इतर फलदांजांना फारशी चमक दाखवता आली नाही. १७७ धावांवर पुर्ण संघ माघारी गेला. तिळक वर्मा ३८ आणि ध्रुव जुरेल २२ वगळता एकाही फलंदाजाला दोन अंकी धावांचा आकडा गाठता आला नाही.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. १७७ धावांचे लक्ष्य बांगलादेशला सोपे वाटत होते. त्यांची सुरुवात देखील चांगली झाली होती. मात्र भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने चार विकेट घेत बांगलादेशचे कंबरडे मोडले. नवव्या षटकात बिश्नोईने ताझींद हसनच्या रुपाने बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने आणखी तीन विकेट्स मिळवल्या. तर यश्सवी जैस्वाल फलदांजी प्रमाणे गोलंदाजीतही कमाल दाखवली. सलामीवीर परवेज इमॉन चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. ४७ धावांवर असताना यशस्वीच्या गोलदांजीवर तो बाद झाला.

भारताने आतापर्यंत २००० साली श्रीलंका, २००८ साली दक्षिण आफ्रिका, २०१२ साली ऑस्ट्रेलिया आणि २०१८ साली न्यूझीलंड विरोधात विजय मिळवला होता. मात्र भारताला यावर्षी विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात अपयश आले.