Shreyas Iyer Ind vs Eng 2nd ODI मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना नागपूरमध्ये पार पडला. टी-20 मध्ये पराभव केल्यानंतर इंग्लंडचा संघ वनडे मालिकेत भारताला पराभवाचा सामना करायला लावेल, असे वाटत होते. पण पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. विशेष म्हणजे हा सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने 4 विकेट्सने इंग्लंडवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 248 धावा केल्या होत्या. इंग्लंड दिलेलं हे धावांचं आव्हान भारतीय संघाने 38.3 ओव्हरमध्येच पार केलं. विशेष बाब म्हणजे या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना फॉर्म गवसला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (india vs eng 1st odi team india won against england in nagpur shreyas iyer biggest contribution in match)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात फलंदाज श्रेयस अय्यर याने 30 चेंडूत अर्धशतकी खेळी पूर्ण केली. श्रेयस अय्यर 36 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 87 धावा केल्या. श्रेयसच्या जागी बढती म्हणून अक्षर पटेल मैदानावर आला. त्याने गिलसोबत शतकी भागिदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अक्षरने 47 चेंडूत 52 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पुन्हा फेल झाला. मात्र शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांना सूर गवसल्याने संघात आनंदाचे वातावरण आहे.
श्रेयस अय्यरनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं
विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघात श्रेयस अय्यरचं नाव नव्हतं. मात्र माजी कर्णधार विराट कोहली दुखापतग्रस्त झाल्याने अय्यरला संघात संधी देण्यात आली. त्यानुसार, कर्णधार रोहित शर्मा याने क्षेयस अय्यरला संघात स्थान देण्याबाबत मध्यरात्री फोन केला आणि विराटच्या जागी त्याला खेळ्यास संधी देण्यात येऊ शकते असं सांगितलं. याबाबत श्रेयस अय्यर याने दिलेल्या माहितीनुसार, “रात्री मी थोडा वेळ मुव्ही पाहण्याचा विचार करत होतो, पण त्यानंतर मला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला आणि विराट कोहलीच्या गुडघ्याला सूज आल्याने तो खेळणार नाही, त्यामुळे कदाचित तू खेळू शकतोस. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि लगेच झोपलो”, असे अय्यर म्हणाला.
मात्र विराट कोहलीच्या जागेवर मिळालेली संधी श्रेयस अय्यरसाठी यशस्वी ठरली. त्याने या संधीचं सोन केलं. अय्यरने फक्त 36 चेंडूत 59 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 9 चौकार मारले. एवढेच नाही तर त्याने 2 षटकारही मारले.
हेही वाचा – IND vs ENG ODI : उपकर्णधार गिलची धडाकेबाज फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 4 विकेट्सनी विजय