घरक्रीडाIND vs ENG : 'अविस्मरणीय विजय'! लॉर्ड्सवरील विजयानंतर टीम इंडियाचे क्रिकेटविश्वातून कौतुक

IND vs ENG : ‘अविस्मरणीय विजय’! लॉर्ड्सवरील विजयानंतर टीम इंडियाचे क्रिकेटविश्वातून कौतुक

Subscribe

भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर १५१ धावांनी मात केली. लॉर्ड्सवरील या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या होत्या. याचे उत्तर देताना इंग्लंडने ३९१ धावा करत पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती. भारतीय संघ दुसऱ्या डावात अडचणीत होता. परंतु, पुजारा (४५) आणि रहाणे (६१) यांनी भारताचा डाव सावरला. तर पाचव्या दिवशी मोहम्मद शमी (नाबाद ५६) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद ३४) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला. त्यामुळे चौथ्या डावात इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान मिळाले. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १२० धावांत आटोपला आणि भारताने हा सामना जिंकला. लॉर्ड्सवरील या विजयानंतर क्रिकेटविश्वातून टीम इंडियाचे कौतुक झाले.

फारच उत्कृष्ट कसोटी सामना! हा सामना पाहताना खूप मजा आली. अवघड परिस्थितीत भारतीय संघाने दाखलेली जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती कौतुकास्पद होती. खूप छान खेळलात, असे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणनेही लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघाचे अभिनंदन केले. कसोटी क्रिकेटचा उत्कृष्ट दिवस आणि प्रत्येक भारतीय चाहत्याला कायम लक्षात राहील असा विजय. दिवसाच्या सुरुवातीला बुमराह आणि शमीने झुंजार फलंदाजी केली. त्यानंतर सिराज, ईशांत, बुमराह, शमी या वेगवान गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्यामुळे भारताने अप्रतिम विजय मिळवला.

तसेच भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही कोहलीच्या भारतीय संघाचे कौतुक केले.

- Advertisement -


हेही वाचा – तेज चौकडीचा भेदक मारा; लॉर्ड्स कसोटीत टीम इंडिया विजयी


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -