घरक्रीडाIND vs ENG 2nd Test : तेज चौकडीचा भेदक मारा; लॉर्ड्स कसोटीत...

IND vs ENG 2nd Test : तेज चौकडीचा भेदक मारा; लॉर्ड्स कसोटीत टीम इंडिया विजयी

Subscribe

भारताचा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवरील तिसरा कसोटी विजय ठरला.

तेज चौकडीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच हा भारताचा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवरील तिसरा कसोटी विजय ठरला. भारताने हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत आटोपला. इंग्लंडकडून कर्णधार जो रूट (३३) आणि जॉस बटलर (२५) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. परंतु, त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार, बुमराहने तीन, ईशांत शर्माने दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

- Advertisement -

पहिल्या डावात राहुलचे शतक

त्याआधी या सामन्यात भारताने पहिल्या डावात लोकेश राहुलच्या (१२९) शतकामुळे ३६४ धावांची मजल मारली होती. याचे उत्तर देताना इंग्लंडने ३९१ धावा करताना पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती. कर्णधार रूटने नाबाद १८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला.

शमी, बुमराहची उत्कृष्ट फलंदाजी 

पाचव्या दिवशी भारताकडून शमी (नाबाद ५६) आणि बुमराह (नाबाद ३४) या तळाच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. त्यांनी नवव्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या होत्या. ही इंग्लंडविरुद्ध नवव्या विकेटसाठी भारताची विक्रमी भागीदारी ठरली. त्यामुळे भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले, जे इंग्लंडला पेलवले नाही. भारताच्या सिराजने दोन्ही डावांत चार-चार विकेट घेतल्या.

- Advertisement -

हेही वाचा – विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -