घरक्रीडारोहित शर्मा बरसला; टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली

रोहित शर्मा बरसला; टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली

Subscribe

इग्लंड दौऱ्यातील टी-२० स्पर्धेतील तिसरा सामना जिंकत भारताने २-१ ही मालिकाही जिंकली आणि २०१९ मध्ये इग्लंड येथे होत असलेल्या वर्ल्डकपसाठी भारत प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. भारताची ही सहावी टी-२० ट्रॉफी आहे. रोहित शर्माने नाबाद राहत ५६ बॉलवर १०० धावा ठोकल्या. रोहित शर्माने नाबाद राहत ५६ बॉलवर १०० धावा ठोकल्या. ११ फोर आणि ५ गगनचुंबी सिक्सर लगावत रोहितने इग्लंडच्या बॉलर्सची अक्षरशः धुलाई केली. सुरुवातील शिखर धवन स्वस्तात आऊट झाल्यानंतर लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत रन रेट सांभाळत १९ व्या ओव्हरलाच भारताला विजय मिळवून दिला. सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार रोहित शर्माला मिळाले.

विजयप्राप्तीनंतर कर्णधार कोहली आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय बॉलर्सने चोख कामगिरी केल्यामुळे आमचे काम सोपे झाले होते. इग्लंडचे बॅट्समन ज्यापद्धतीने खेळत होते, त्यावरुन ते २३० पर्यंत मजल मारतील असे वाटले होते. पण त्यानंतर बॉलर्सने ठराविक अंतराने विकेट्स काढल्या. तसेच हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळी आमच्यासाठी आज महत्त्वाची ठरली असल्याचे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

विक्रमादित्य महेंद्रसिंग धोनी

आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केलेल्या धोनीने या तिसऱ्या मॅचमध्येही आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. एका टी-२० सामन्यात पाच कॅच पकडण्याचा विक्रम त्याने केला आहे. तसेच टी-२० स्पर्धेत ५० कॅच पकडणारा खेळाडू म्हणूनही धोनीची नोंद झाली आहे.

इग्लंडने आपल्या पहिली इंनिगमध्ये २० ओव्हर खेळून ९ विकेटच्या बदल्यात १९८ धावा केल्या होत्या. भारतासमोर १९९ धावांचे लक्ष्य होते. आज संधी मिळालेल्या सिद्धार्थ कौलने संधीचे सोने करत ४ ओव्हरमध्ये ३५ रन्स देत २ विकेट्स घेतल्या. यामध्ये जॉस बटलर आणि धडाकेबाज बॅट्समन प्लंकेटचा समावेश होता. तसेच शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ ७ धावा देत इग्लंडला २०० च्या आत रोखून धरण्याचे आव्हान कौलने लीलया पेलले.

- Advertisement -

हार्दिक पांड्या या इंनिगमधील यशस्वी बॉलर ठरला. चार ओव्हरमध्ये ३८ रन्स देत हार्दिकने ४ विकेट्स घेतल्या आहेत. इग्लंडची सुरुवात तडाखेबाज झाली होती. जेसन रॉय आणि जॉस बटलरने पहिल्या सात ओव्हरमध्ये ९४ धावांची पार्टनरशिप केली. मात्र सातव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर सिद्धार्थ कौलने बटलरला माघारी धाडले. त्यानंतर लगातार इग्लंडच्या विकेट्स पडत राहिल्या. मधल्या फळीला त्यानंतर काही खास कामगिरी करता आली नाही. सुरुवातीला ढेपाळलेल्या बॉलर्सना नंतर चांगलाच सूर गवसला. त्यामुळेच इग्लंडला २०० धावांच्या आत रोखता आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -